पुणे
डॉ. गिरीश देसाई यांना मातृशोक ; सुशीला देसाई यांचे निधन

पिंपरी (जनमंथन वृत्तसेवा) : थेरगाव येथील ज्येष्ठ नागरिक सुशीला मोहन देसाई (वय ८४ वर्षे) यांचे सोमवारी (दि. १९ फेब्रुवारी) वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुले, सूना, नातवंडे असा परिवार आहे. अशोक सोसायटी, थेरगाव येथे रहात होत्या. ज्येष्ठ अभियंता मदन व ज्येष्ठ दंत रोग तज्ञ डॉ. मिलिंद आणि पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या त्या मातोश्री होत.