आरोग्यतंत्रज्ञानपुणेशैक्षणिकसामाजिक

हॅलो डॉकटर : डोक्यावरचे टक्कल आणि केसांचे रोपण

Spread the love

 

स्त्री असो किंवा पुरुष डोक्यावरचे काळेभोर आणि दाट केस म्हणजे स्त्री पुरुषांच्या सौंदर्याचे, तारुण्याचे प्रतीक असतात. किंबहुना या केसांमुळेच चेहऱ्याचं सौंदर्य खऱ्या अर्थाने खुलत. परंतु जेंव्हा ऐन तारुण्यात किंवा वार्धक्यापूर्वीच अचानक जेंव्हा केस गळती होऊ लागते आणि हळूहळू डोक्यावर टक्कल दिसू लागत तेंव्हा याच केसानी आपला गळा कापला अशी भावना आपल्या मनात निर्माण होते. मात्र, आता वैद्यकशास्त्र हे अत्याधुनिक बनलेले आहे. शरीराच्या कुठल्याही अवयवाचे जसे रोपं होऊ शकते तसेच डोक्यावरील केसांचे देखील रोपण अर्थात हेअर ट्रान्सप्लांट (Hair Transplantation) होऊ शकते. केसाचे रोपं म्हणजे नक्की काय? आणि अशा प्रकारे केसांचे रोपं केल्याने पुन्हा आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य खुलते का? याच प्रश्नाचा वेध घेण्यासाठी केशविकार तज्ज्ञ आणि त्वचाविकार तज्ज्ञ डॉ. धनंजय चव्हाण (Dr. Dhananjay Chavan) यांच्याशी केलेली बातचीत.

Doctor Dhananjay Chavan (Dermatologist, Dermatosurgeon, Hair Transplant Surgeon, Aesthetic Dermatologist)

१) डोक्यावरील केस म्हणजे स्त्री पुरुषांच्या सौंदर्याचं प्रतीक मानलं गेलं आहे परंतु अचानक केस गळती सुरु होते आणि टक्कल पडू लागत हि प्रक्रिया नेमकी कशी सुरु होते आणि त्याची कारण काय आहेत?

केस हा मानवी शरीराचा अत्यंत महत्वाचा घटक मानला गेला आहे. डोक्यावरील काळेभोर दाट केस हे चेहऱ्याचं सौंदर्य वाढवतात. अर्थात आपले व्यक्तिमत्व हे सुंदर असावं आणि त्यासाठीच डोक्यावर भरपूर काळे केस असावेत यासाठी प्रत्येकजण सजग असतोच. अशा परिस्थितीत अचानक केस जेंव्हा गळू लागतात तेंव्हा टायची अनेक कारण असू शकतात. अनुवंशिकता हे अत्यंत महत्वाचं कारण असू शकत. अनेकदा आपल्या आई किंवा वडिलांना केस गळण्याचा त्रास असतो. त्यांच्याही कुटुंबातील अनेकांना हा त्रास पिढीजात असू शकतो म्हणून तो अनुवांशिकरीत्या आपल्याला देखील होतो. याशिवाय आहारातील अनेक पोषक घटकांची कमतरता त्यामुळे होणारा ऍनिमिया यामुळे रक्ताचा अभाव असू शकतो आणि केस गळतात. आपल्या शरीरांतर्गत अनेक प्रकारचे हार्मोनल आजार असू शकतात त्याचा केसांवर परिणाम होऊ शकतो. विविध प्रकारची औषध, अनेक प्रकारचे ताणतणाव, अनेक प्रकारचे आजार अशा अनेक कारणामुळे डोक्यावरचे केस गळू शकतात. मात्र योग्य उपचार करून आणि हेअर ट्रान्सप्लांट करून हे केस पूर्ववत होऊ शकतात.

२) स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये केस गळतीचे वेगवेगळे प्रकार असतात का?

अनेकदा व्हिटॅमिन्स ची कमतरता (Deficiency of vitamins) असेल किंवा एखादा आजार होऊन गेला असेल तर अशा प्रकारे डोक्यावरचे केस गळतात. केस गळती हि अनुवांशिक देखील असते. डोक्यावरचे केस पातळ होतात आणि मोठ्या प्रमाणात केसगळती होऊन टक्कल पडू लागत. पुरुषांमध्ये पुढच्या बाजूने किंवा मागच्या बाजूने किंवा दोन्ही बाजूचे मधले केस गळतात. स्त्रियांमध्ये मात्र डोक्यामध्ये मध्ये जो भांग असतो तिथे केस गळती होते. आणि टक्कल पडू लागत. स्त्री आणि पुरुषांमधील केस गळतीचे प्रकार जरी वेगवगळे असले तरी केसांचे रोपण होऊ शकते आणि केस पूर्ववत देखील होऊ शकतात.

३) अशा प्रकारे केस गळतीवर उपचार नेमके काय आहेत?

डाएट (Diet) हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. आपल्या आहाराला देखील तितकंच महत्त्व आहे. आपल्या आहारात प्रथिन, व्हिटॅमिन्स, कर्बोदके, कॅल्शिअम अशा सर्व घटकांचा समावेश असायला हवा. आपण जर मांसाहारी असू तर चिकन, मासे, मटण, अंडी याचा समतोल समावेश आहारात असायला हवा. शिवाय पालेभाज्या आणि मोड आलेली कडधान्य देखील तितकीच महत्त्वाची आहेत. आपल्या ताण तणावाचं सुयोग्य नियोजन देखील असायला हवं. केस गळती अनुवांशिक असेल तर केस गळती सुरु होण्यापूर्वीच जर योग्य त्या केशविकार तज्ज्ञ आणि त्वचाविकार तज्ज्ञांचा सल्ला घेतला तर केसांची गळती थांबवता येऊ शक्ते.

४) टक्कल पडल्यानंतर त्यावर कोणत्या प्रकारची औषध उपलब्ध आहेत? आणि केसांचे रोपण म्हणजे काय ?

केस गळतीची कारण शोधून त्यानंतरच त्यावर उपचार करता येतात. केसगळती वर उपाय म्हणून सध्या जगभरात एफ.डी.ए. प्रकारची उपचार अपद्धती प्रसिद्ध झालेली आहे. शिवाय फिनास्टेराइट नावाची गोळी आणि मिनॉक्सीडील हे औषध टक्कल पडलेल्या जागी लावू शकतो. याशिवाय लो लेव्हल लेझर थेरेपी, डर्मा रोलर अशा याप्रकारच्या चेहेरेपी देखील केस गळतीवर उपलब्ध आहेत. मानवी डोक्यावर सुमारे १ लाख केस असतात. जर पुढल्या बाजूला टक्कल पडले असेल तर डोक्याच्या मागील बाजूचे केस काढून ते रोपं करता येतात. खरं तर केसांचे रोपंण हि एक शास्त्र आहे तसेच ती एक उत्तम कला आहे. डोक्याच्या मागील बाजूचे जे २५ हजार केस उरलेले असतात त्यापैकी दोन ते तीन हजार केस काढून ते पुढील बाजूला जिथे टक्कल पडलेले आहे तिथे रोपण करून दाट केसांचा आभास तयार करणे हि खरी कला आहे. परंतु केस रोपणामुळे पूर्वीसारखेच चेहऱ्याचे सौंदर्य खुलते.

संकलन – संयोजन : सुबोध रणशेवरे
संपर्क : मो. नं. ९८३३१४६३५६
ई-मेल : subodh.ranshevre@rediffmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
×