पुणेमहाराष्ट्र
पुण्यातील कॅम्प भागातील हॉटेल साहिलला आग; अग्निशमन दलाच्या वेळीच कारवाईमुळे अनर्थ टळला
उपहारगृहातील भटारखान्यात गॅस गळती होऊन लागली होती आग

पुणे (जनमंथन वृत्तसेवा) : कॅम्प परिसरातील शरबतवाला चौक येथील हॉटेल साहिल या हॉटेलच्या उपहारगृहातील भटारखान्यात गॅस गळती होऊन आग लागल्याची घटना आज, दि. ३१ डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडल्याने परिसरात भीतीच्या वातावरण निर्माण झाले होते. भटारखान्यातील कामगार बाहेर पळाल्याने अनर्थ टळला. केंद्रीय अग्निशमन मुख्यालय आणि पुणे कॅन्टोन्मेंट अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली.
केंद्रीय अग्निशमन मुख्यालय आणि पुणे कॅन्टोन्मेंट अग्निशमन दल या दोन्हीकडील दोन गाड्या तैनात करून तत्काळ कारवाई केली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसून अग्निशमन दलाच्या पथकाने तातडीने आग विझवली.