पुणेमहाराष्ट्र
पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची बदली; अमितेश कुमार नवे पोलीस आयुक्त

पुणे (जनमंथन वृत्तसेवा) : पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार (Police Commissioner Ritesh Kumar, IPS)यांची गृहखात्याकडून (महासमादेशक, होमगार्ड, महाराष्ट्र राज्य) पदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी अमितेश कुमार (Amitesh Kumar, IPS) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अमितेश कुमार हे १९९५ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. रितेश कुमार भारतीय पोलीस सेवेच्या १९९२ च्या तुकडीतील अधिकारी आहेत. रितेश कुमार यांनी दि. १६ डिसेंबर २०२२ रोजी पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला होता.