पुणेराजकीयसामाजिक

पुणेकरांनी सलोखा, शांतता बाळगावी : अली दारूवाला

शेख सल्ला दर्गा अतिक्रमण प्रकरणावर निघाला शांततामय तोडगा

Spread the love

पुणे (जनमंथन वृत्तसेवा) : पोलीस आयुक्त अमितेश कुमार, महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, शेख सल्ला दर्गाचे विश्वस्त, राष्ट्रीय अल्पसंख्यंक आयोगाचे सल्लागार अली दारूवाला आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या बैठकीत शेख सल्ला दर्गा अतिक्रमण प्रकरणावर तोडगा निघाला असून पुणेकरांच्या सलोखा, सामंजस्याचे दर्शन घडले आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाचे सल्लागार अली दारूवाला यांनी व्यक्त केली आहे.

या संदर्भात शनिवारी पोलीस आयुक्त कार्यालयात सर्व संबंधितांच्या बैठकीत दर्गाच्या विश्वस्तांनी २०१९ नंतरचे अतिक्रमण स्वताहून काढण्याची भूमिका घेतली. या बैठकीत शांततेत संवाद झाला आणि तोडगा निघाला, असे अली दारूवाला यांनी सांगितले. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पुणे महानगरपालिका विक्रम कुमार, सह पोलीस आयुक्त प्रवीण पवार, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ – १) संदीप गील, राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाचे सल्लागार अली दारूवाला, दर्गा विश्वस्त आदी उपस्थित होते. दर्गा संबंधी तणावाच्या अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन अली दारूवाला यांनी केले आहे.

शेख सल्ला दर्गा अतिक्रमण प्रकरणावर निघाला शांततामय तोडगा. (Peaceful settlement of Sheikh Salla Dargah encroachment issue.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
×