पुणेमहाराष्ट्र

पुण्यात दोन ठिकाणी आगीच्या घटना; घटनेमुळे शहरात खळबळ

सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही!

Spread the love

पुणे (जनमंथन वृत्तसेवा) : शहरातील येरवडा येथील बालाजीनगर येथे (Yerawada, Balaji Nagar) लाकडी साहित्याच्या गोडाऊनला आज शनिवारी (दि. १६ मार्च) सकाळी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या दाखल झालेल्या होत्या.

या आगीत गोडाऊन मधील लाकडी साहित्य जाळून खाक झाले आहे. तसेच इतर साहित्याचे देखील संपूर्ण नुकसान झालेले आहे. आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही. आग विझविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

वाघोलीत गोदामाला आग :

पुण्यातील वाघोलीत (Fire at Wagholi, Pune) असलेल्या वाहनांचे स्पेअर पार्ट असलेल्या गोदामाला आग लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. परिसरातील गाडे वस्ती भागात वाहनांचे जुने स्पेअर पार्ट असलेल्या स्क्रॅप गोदामाला आग लागली. आगीची माहिती अग्निशमन दलाल देताच प्रशासनाचे बचाव कार्य सुरु झाले. अथक प्रयत्नांनतर आग विझवण्यात आली. आगीच्या दोन्ही घटनांमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
×